मुंबई – आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपच्या युतीबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या होणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
काही पक्षांच्या 5 वर्षांनंतर बैठका होतात. शिवसेना आणि भाजपच्या बैठका रोजच होत असतात. युती इतकी भक्कम आहे की, सौम्य काय तीव्र धक्के बसले तरी काही फरक पडणार नाही. काही तडे गेले असतील तरी ते भरुन निघतील असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या होणार आहेत, एकत्र होणार नाहीत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS