मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज मुंबईत बैठक आयोजित केली होती.या बैठकीला राज्यातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येऊ घातलेली विधानसभा निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान होईल, असा अंदाज मांडला आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ यात्रा काढणार आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही यात्रा काढली जाणार आहे. राज्यातील सर्व मतदारसंघांमधून ही रथयात्रा जाणार असून यामध्ये ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार २२० पार’ या प्रमुख घोषणा असणार आहेत.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात असल्याचं दिसत आहे.
COMMENTS