चंद्रकांत पाटील म्हणतायत, बोंडअळीमुळे शेतक-यांचं जास्त नुकसान नाही!

चंद्रकांत पाटील म्हणतायत, बोंडअळीमुळे शेतक-यांचं जास्त नुकसान नाही!

मुंबई – राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे हैराण झाला आहे. मात्र या अळीमुळे अजूनपर्यंत शेतक-यांचं नुकसान झालं नसल्याचा शोध राज्याचे पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लावलाय. तसेच या बोंडअळीमुळे राज्यातील शेतक-यांचं आतायपर्यंत नुकसान झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत कापसाच्या दोन वेचण्या झाल्या आहेत. परंतु यादरम्यान बोंडअळीमुळे कोणतही नुकसान झालं नसून तिस-या वेचणीदरम्यान बोंडअळीचा काहिसा प्रादूर्भाव जाणवत असल्याचं ते म्हणालेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आतापर्यंत दोन वेचण्या झाल्या असून मागील वर्षीपेक्षा डबल कापूस बाजारात गेला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शेतकरी सध्या तिसरी वेचणी करत असून या वेचणीदरम्यान काही ठिकाणी बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसत आहे. सध्या डिसेंबर महिना सुरु असून अजून कापूस बाजारात यायचा बाकी आहे असंही पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच ज्याठिकाणी शेतक-यांचं बोंडअळीमुळे नुकसान झालं आहे त्याठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पंचनामे लवकरात लवकर करुन याबाबतचा अहवाल एनडीआरएफकडे पाठवला जाणार आहे. या निकषामध्ये जे शेतकरी बसतील त्यांनाच नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचंही चंद्रकांतदादा यांनी म्हटलं आहे.त्यामुळे नुकसान होऊनही आपल्याला नुकसानभरपाई मिळणार की नाही या चिंतेत सध्या राज्यातील शेतकरी पडले आहेत.

COMMENTS