मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी खूप वेळ चर्चा होत होती आजे अखेर भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील प्रवेश करत आहेत. हा निर्णय लोकसभेच्या दोन दिवस जरी आधी केला असता तर बारामती जिंकलो असतो. सुप्रिया सुळे यांना घरी पाठवायचे होते, मात्र ते झालं नाही. हर्षवर्धन यांनी जरा निर्णय तेव्हा घेतला असता तर ते झालं असतं. ते हुशार राजकारणी आहेत, लोकसभेचा निकाल लागल्यावर बघू असं त्यांनी तेव्हा ठरवलं होतं नाहीतर ते तेव्हाच भाजपात आले असते.असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच युतीचेच सरकार मोठ्या बहुमताने येणार. आहे. आधी घोषणा केली होती की अब की बार 220 पार, आता ही घोषणा मागे पडली आहे आता यापेक्षा जास्त जागा मिळतील असंही पाटील म्हणाले आहेत. तसेच हर्षवर्धन यांना आश्वस्त करतो की त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल. अनेक मुख्यमंत्र्यांकरिता हर्षवर्धन पाटील यांनी बुलेटप्रूफ जॅकेट म्हणून काम केलं, आम्हा विरोधकांची टीका थोपवायचे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीसाहेब पाच वर्षे आपण राज्याचे कणखर नेतृत्व केलं, दुष्काळ – पूर याठिकाणी लोकांनां मदत केली. आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्यांना मदत करावी अशी अपेक्षा आमची आहे. आता भाजपशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट झालं आहे, दोन विनंती करत आहे. माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती बघा, शेजारी बदलू शकत नाही, आमच्याकडे लक्ष द्या आणि आमच्या तालुक्यात पाण्याचा प्रश्न आहे तिकडेही लक्ष द्या. तसेच मी कुठलीही अट घालून भाजपमध्ये आलेलो नाही. तसेच जी काही जवाबदारी पक्ष माझ्यावर टाकेल ती मी पार पाडेन असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
LIVE | Some prominent personalities joining BJP in the presence of Hon CM @Dev_Fadnavis https://t.co/MR9TBWsa0o
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 11, 2019
COMMENTS