सांगली महापालिका निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांची महत्त्वपूर्ण माहिती !

सांगली महापालिका निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांची महत्त्वपूर्ण माहिती !

सांगली – सांगली महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरु केली असून आज घेण्यात आलेल्या बैठकीनंत चंद्रकांत पाटील यांनी उमेदवार निवडीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या निवडणुकीसाठी मुलाखती 1 आणि 2 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच 4 जुलै रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली केली जाणार असून काँग्रेस-राष्ट्रवादीतून येणाऱ्यांना मुलाखती देणं गरजेचं असून ऐनवेळी कोणी आले तर लवचिकता दाखवली जाईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

उमेदवारांची निवड

महापालिकेचा राज्य सरकारकडून कशाप्रकारे मदत करून विकास होईल. तसेच महापालिकेत काय करणार? या दोन मुद्यांवर पक्षाचा वचननामा करून निवडणूक लढवली जाणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुलाखतीनंतरच उमेदवारी निश्‍चित होईल. तसेच कोणी उमेदवारी निश्‍चित झाल्याचा प्रचार करत असले तरी पक्षच अंतिम निर्णय घेणार असून युतीबाबत शिवसेना, रिपाई आणि समविचारी पक्षांशी चर्चा केली जाणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

 काय म्हणाले चंद्रकांत पाटील

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज प्रमुख कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. तीनशेहून अधिक इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत. मुलाखती 1 आणि 2 जुलै रोजी घेतल्या जातील. भाजप लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मुलाखतीत निवडणूक लढवत आहात? यासह इतर प्रश्‍न विचारले जातील. 4 जुलै रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाईल आणि अर्ज भरले जातील. 1 जुलै रोजी सांगलीत कच्छी जैन भवनमध्ये दहा प्रभागातील मुलाखती सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत होतील. तर दोन जुलै रोजी मिरजेतील पटवर्धन हॉलमध्ये मुलाखती घेण्यात येणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS