…तरच सरकार स्थापन होईल, भाजपमध्ये सगळे अपक्ष आले तरी काही फरक पडणार  नाही – चंद्रकांत पाटील

…तरच सरकार स्थापन होईल, भाजपमध्ये सगळे अपक्ष आले तरी काही फरक पडणार नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई – सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये सर्व अपक्ष आमदार आले तरी सरकार स्थापन होत नसल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सरकार स्थापन करायचं असेल तर भाजपा आणि शिवसेना एकत्र येवुनच होवू शकते असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. महिना दीड महिने खूप दमछाक झाली आहे. त्यामुळे थोडं निवांत सुरू आहे. महाराष्ट्रत सगळं व्यवस्थित सुरू आहे. ठरल्याप्रमाणे शपथविधी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच आम्ही देखील प्रामाणिक आहोत.बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला देखील इनामदारी शिकवली बाळासाहेबांचा वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक असून ते कधीही काँग्रेससोबत जाणार नाहीत असंही पाटील यांनी म्हटलं आहे.ते झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान आपल्याला मुख्यमंत्री होण्याची कणभर इच्छा नाही मुख्यमंत्री फडणवीस हे अतिशय पारदर्शक माणूस आहेत. सर्वांना न्याय देतात तेच मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे.अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या तिघांमध्ये काय ठरलं हे माहिती नाही. अमित शाह यांनी काय वचन दिले हे मला माहिती नाही परंतु सरकार स्थापन करायचं असेल तर भाजपा आणि शिवसेना एकत्र येवुनच होवू शकते असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS