सांगली – सांगली महापालिका निवडणुकीत भाजपचे 42 नगरसेवक निवडून येतील असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे. आम्ही सर्व्हे केला असून त्यानुसार हा आकडा सांगत आहोत असंही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. भाजपने सर्व जाती धर्माचे उमेदवार दिले आहेत. आतापर्यंतच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारभाराला सांगलीकर कंटाळाले असून त्यांनी गेल्या 20 वर्षात शहराचा काहीच विकास केला नाही असा आरोही त्यांनी केला. काँग्रेस आघाडीकडे व्हिजन नव्हते. त्यामुळे सांगली मोठं खेडं झालं. सांगलीत काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त भ्रष्टाचार केला असा आरोप करत त्यांनी आता सांगलीत भाजपची सत्ता येईल असा दावा केला आहे. त्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला जाईल असं आश्वासनंही त्यांनी दिलंय.
चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या सर्व्हेनुसार केलेला आकडा खरा ठरतो का ते पाहण्यासाठी आपल्याला निकालाची वाट पहावी लागेल. सर्वच पक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक आघाडी करुन लढवत आहे. शिवसेनेना स्वबळावर रिंगणात उतरली आहे. तर सर्व पक्षातल्या नाराजांनी एकत्र येऊन अपक्षांची आघाडी केली आहे. एकाच चिन्हावर लढवण्याचा निर्णय अपक्षांच्या आघाडीनं घेतला आहे.
COMMENTS