पुणे : शिवसेनेशी युती तोडल्यानंतर भाजप मनसेसोबत जाणार असल्याची मागील अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अमराठी कार्यकर्ते आणि नेते सहभागी होणं, ही चांगली गोष्ट आहे. मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, अशी भूमिका भाजप चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनसे सोबत भविष्यात युती होण्याचे संकेत दिले. पाटील म्हणाले, कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, याचं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
COMMENTS