उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील मातोश्रीवर !

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील मातोश्रीवर !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मातोश्रीवर गेले आहेत. मराठा आरक्षणाचं विधेयक सभागृहात मांडण्याआधी उद्धव ठाकरेंशी चंद्रकांत पाटील हे चर्चा करण्यासाठी गेले असल्याची माहिती आहे. आज गटनेत्यांच्या बैठकीत अहवाल मंडण्यावर विरोधक ठाम राहिल्याने विधेयक मांडताना सरकार अडचणीत येऊ शकतंत्यामुळे शिवसेनेच्या पाठींब्यासाठी भाजप मंत्री मनधरणीसाठी मातोश्रीवर गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळे याबाबत भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मदत करणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान भाजपने आमदारांना व्हीप जारी केला आहे. अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस सभागृहात हजर राहण्यासाठी हा व्हीप काढण्यात आला असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात येणार असल्याने भाजपा सतर्क असल्याचं दिसत आहे.

COMMENTS