“भाजपची पुन्हा सत्ता आली तर चंद्रकांत पाटील होणार मुख्यमंत्री”

“भाजपची पुन्हा सत्ता आली तर चंद्रकांत पाटील होणार मुख्यमंत्री”

मुंबई – राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस यांच्याऐवी चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री होतील तर फडणवीस हे केंद्रात जातील अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेने वर्तवली आहे. तसेच २०१९ मध्ये भाजपाला बहुमत मिळणे कठीण आहे मात्र मित्र पक्षांच्या साथीने भाजपा पुन्हा सत्तेत येईल. तर राज्यात विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत झाली तर भाजपा राज्यात सत्तेत येईल असा अंदाजही यावेळी वर्तवण्यात आला.ठाण्यातील ब्राह्मण सभा मंडळ या ठिकाणी ज्योतिष अधिवेशन पार पडले. या वेळी २०१९ च्या निवडणुका या सत्रात पुण्याचे सिद्धेश्वर मारकटकर यांनी ही राजकीय भाकिते मांडली आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रिका चांगली आहे त्यामुळे ते आपला कार्यकाळ पूर्ण करतीलच शिवाय २०१९ मध्ये ते केंद्रात जाऊ शकतात असं अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात जे असंतोषाचे वातावरण आहे ते निवळण्यास ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा कालावधी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतील का असे विचारले असता त्यांची आघाडी होईल आणि त्यांना जास्त जागा मिळतील असही भविष्य परिषदेत म्हटले गेले आहे.तसेच जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या झाल्या तर महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीला जास्त संधी असून अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील असाही अंदाज भविष्य परिषदेने वर्तवला आहे.

COMMENTS