सामनात खालच्या स्तराची भाषा

सामनात खालच्या स्तराची भाषा

पुणे – गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते तसेच भाजप महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा!”, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

गेल्या एक वर्षांपासून भाजप-शिवसेना एकमेकांवर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडत नाही. शिवसेना आपल्या पक्षाची भूमिका सामनातून मांडत असताना यातील अग्रलेखाच्या भाषेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचंड नाराज आहेत. त्याबद्दल त्यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरेंकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी लिहलेल्या पत्रात म्हटल आहे की, “वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या , त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की आपणालाही ही भाषा आवडत नसेल.”

“आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करु इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा,” असे म्हटलं आहे.

COMMENTS