उस्मानाबाद – राज्यात सगळीकडे सध्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न गाजतोय. सरकारनं हमी भाव जाहीर करुनही अनेक ठिकाणी खरेदी सुरू झालेली नाही. सोयाबीनचा हवी भाव सरकारनं ठरवला खरा मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनची खरेदी झालेली नाही. त्यामुळे शेतकरी तीन हजारांचा हमी भाव असताना गरजेपोटी व्यापा-याला 2200 ते 2500 रुपयांनी सोयाबीनची खरदी करुन मोकळे झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री आज उस्मानाबादच्या दौ-यावर होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी टाटा किंवा इतर मोठ्या खरीदारांबरोबर शेतमाल खरेदीबाबत सरकार करार करण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं. सरकारने राज्यभरात तुरीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. मात्र ती विकता आली नाही. त्यामुळे सरकारला तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता टाटांसारख्या खरेदीदारांसोबत करार करावाच लागणार आहे. सरकार आपलं काम सोडून धान्यांचा व्यापार करु शकत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
शेतक-यांच्या मालाला हमी भाव देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. असं असताना चंद्रकांत पाटील असा व्यापार सरकार करु शकणार नाही असं कसे म्हणून शकतात. कशाचेही भाव वाढले की सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करंत. किंवा परदेशातून मोठ्या प्रमाणात ते आयात करतं. मग हमी भाव मिळत नसेल तर तो मिळवून देणं आणि प्रसंगी त्याची सरकारने स्वतः खरेदी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. असं असतानाही तो टाळण्या प्रयत्न सरकारचा दिसतोय. पहा काय म्हणाले चंद्रकांत दादा याविषयी….
COMMENTS