अजित पवारांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश !

अजित पवारांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश !

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा असून २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले होते. हे सगळे प्रकरण कोर्टात आहे, आता या प्रकरणी कोर्टाने अजित पवारांसह एकूण पन्नास जणांविरोधात येत्या पाच दिवसात गुन्हा दाखल करा असे म्हटले आहे.

दरम्यान आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून राज्य सहकारी बँकेचा उपयोग झाला होता. यावेळी २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असून २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS