दिल्लीच्या तख्तावर पुन्हा गाजला शिवबांचा राज्याभिषेक सोहळा !

दिल्लीच्या तख्तावर पुन्हा गाजला शिवबांचा राज्याभिषेक सोहळा !

दिल्ली – दिल्लीच्या तख्तावर पुन्हा शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा गाजला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या संचलनात महाराष्ट्राने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यााभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. २०१५ मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता. दोन वर्षांनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा हा सन्मान मिळाला असून एकूण २३ चित्ररथांचं सादरीकरण करण्यात आलं होतं. त्यापैकी महाराजांच्या राजाभिषेक सोहळ्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

 

https://twitter.com/TawdeVinod/status/957497844386160640

 

प्रा. नरेंद्र विचारे यांची संकल्पना व कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई यांनी साकारलेल्या या चित्ररथाने संचलनावेळी सर्वांची मने जिंकली होती.चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली होती. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती व त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले होते. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आले होते. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले होते. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या.त्यामुळे या देखाव्यानं संपूर्ण देशाची मनं जिकंली असल्याचं पहावयास मिळालं आहे.

 

 

COMMENTS