अजित पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य!

अजित पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य!

मुंबई -राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी भुजबळ यांनी अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपला निर्णय मागे न घेण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. कालही छगन भुजबळ यांन अजित पवारांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भूजबळ यांनी अजित पवार यांना त्यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे 30-35 आमदार अस्वस्थ असल्याची माहिती दिली आहे. तसेच राष्ट्रवादीत परत येण्याचे आवाहनही केले आहे.

दरम्यान अजित पवार यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असंही या अस्वस्थ आमदारांचं म्हणणं असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गुंतागुंत समोर आली आहे. यातून मोठं नुकसान होऊ नये म्हणूनच राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे अजित पवार आपला निर्णय मागे घेणार का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS