सनातनवरील बंदीबाबत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया !

सनातनवरील बंदीबाबत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया !

नाशिक- सनातन या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विरोधकांककडून केली जात आहे. याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आपण मंत्री असताना 2005 मध्येच सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली होती असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच सनातनवर बंदी घालण्याची मागणी भुजबळ यांनी केली असून हिंदुत्त्ववादी विचारसरणी संविधानाचे खच्चीकरण करुन मनुवादचे समर्थन केले जात आहे. तसेच भाजप सरकारने सांगितले ‘मेक इन इंडिया’, हे लोक घरात ‘बॉम्ब’ तयार करू लागले असल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नाशिकमध्ये आज  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘संविधान बचाव, देश बचाव’ परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत छगन भुजबळ बोलत होते. यावेळी भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत तात्काळ सनातन या संस्थेवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. तसेच यावेळी संविधान बचाव रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मनुस्मृती आणि ईव्हीएम मशिनच्या प्रतिकृतींचे दहन केले.

 

COMMENTS