छगन भुजबळांना जामीन मंजूर, राज ठाकरेंची भाजपवर टीका !

छगन भुजबळांना जामीन मंजूर, राज ठाकरेंची भाजपवर टीका !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत. परंतु छगन भुजबळ यांना भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर काढल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. छगन भुजबळांवर असलेल्या आरोपांची चौकशी होईल, त्यात ते दोषी आढळले, तर त्यांना शिक्षाही होईलच. मात्र भुजबळांना जामीन मिळण्यासाठी जो उशीर झाला, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत  जामीन मंजूर केला आहे. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला आहे. तसेच बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच, भाजपलाही एक्सपायरी डेट आहेच, असा टोलाही त्यांनी लगावला.

COMMENTS