नवी दिल्ली – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान घेण्यात आलं आहे. १८ जागांसाठी आज मतदान घेण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान सुरु होतं. तर राजनंदगाव येथील पाच मतदारसंघात आणि बस्तर येथील ३ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते ५ यावेळेत नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
#ChhattisgarhElections2018: Voting has stopped due to technical problem in the EVM at the Pink polling booth in Kamla College, in Rajnandgaon's Sangwari pic.twitter.com/cgrjUCQcga
— ANI (@ANI) November 12, 2018
दरम्यान दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांची दहशत असून याठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. दंतेवाडा येथील कटेकल्याण ब्लॉकमधील तुमाकपल कॅम्प येथे नक्षलवाद्यांनी आयईडी (इम्प्रोव्हाईजड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोट केला होता. नक्षलवाद्यांनी २ किलो वजनाचा आयईडी येथे पेरला होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास तुमाकपल-नयनार रस्त्यावर हा स्फोट झाला असून सुरक्षा दल आणि मतदान अधिकारी सुरक्षित आहेत.
तसेच राज्यातील नक्षलप्रभावित विजापूर जिल्ह्यातील आलापल्ली येथे नक्षलवाद्यांनी २७ ऑक्टोबरला बुलेट प्रुफ बंकर सुरंगाने उडवले होते. या घटनेत सीआरपीएफच्या १६८ बटालियनचे ४ जवान शहीद झाले होते. तर २९ तारखेला नक्षलवाद्यांनी दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार गावातील जिल्हा पंचायत सदस्य तसेच भाजपा नेते नंदलाल मुड्यामी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दूरदर्शनच्या एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे छत्तीसगडमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
Sukma: A 100-year-old woman reaches a polling station in Dornapal to cast her vote in the first phase of #ChhattisgarhAssemblyElections2018 pic.twitter.com/A8W8zxpcxf
— ANI (@ANI) November 12, 2018
COMMENTS