नवी दिल्ली – छत्तीसगढमधील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बसपाच्या अध्यक्ष मायावतींनी मोठी घोषणा केली आहे. मायावतींच्या बहूजन समाज पार्टीनं जनता काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत बहूजन समाज पार्टी 35 जागा लढवणार आहे. तर जनता काँग्रेस पार्टी 55 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मायावतींनी दिली आहे.
Bahujan Samaj Party(BSP) has decided to contest upcoming assembly polls in alliance with Janta Congress Chhattisgarh. BSP will fight on 35 seats&Janta Congress Chhattisgarh will contest on 55 seats.If we win, Ajit Jogi will be the CM: BSP Chief Mayawati on #Chhattisgarh elections pic.twitter.com/pnW0APhAUL
— ANI (@ANI) September 20, 2018
दरम्यान या निवडणुकीमध्ये आम्हीच जिंकणार असल्याचा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपला हरवण्यासाठी आम्ही इतरही छोट्या पक्षांना सोबत घेणार असल्याचं मायावतींनी म्हटलं आहे. याबाबत आज अजित जोगी आणि मायावतींनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. तसेच या निवडणुकीमध्ये आमचा विजय झाला तर अजित जोगी यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची घोषणाही यावेळी मायावती यांनी केली आहे.
COMMENTS