छत्तीसगडमध्ये कोणाला मिळणार सत्ता, वाचा एक्झिट पोलचा अंदाज !

छत्तीसगडमध्ये कोणाला मिळणार सत्ता, वाचा एक्झिट पोलचा अंदाज !

नवी दिल्ली – छत्तीसगड विधानसभा निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचे ता सर्वांना वेध लागले आहे. त्यापूर्वी विविध संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपलाच बहूमत मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

न्यूज नेशनचा एक्झिट पोल 

न्यूज नेशनच्या अंदाजानुसार छत्तीसगडमध्ये भाजपला ३८ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के तर जेसीसला १३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

पब्लिक-सीव्होटरचा अंदाज

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे पुन्हा सरकार बनण्याची शक्यता. भाजपला ३५-४३, काँग्रेसला ४०-५0 आणि मायावतींच्या बसपाला ३-७ जागा मिळण्याची शक्यता पब्लिक-सीव्होटरनं वर्तवली आहे.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सचा अंदाज

छत्तीसगडमध्ये रमन सिंह चौथ्यांदा भाजपचे सरकार बनवण्याची शक्यता इंडिया टीव्ही-सीएनएक्सनं वर्तवली आहे.

 

 

COMMENTS