मुंबई – केंद्र सरकारनं आज अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड नंबरची सक्ती केली आहे. आपला मोबाईल नंबर असो, बँक खाते असो वा पॅनकार्ड असो किंवा मेडिकलमध्ये एखादे महत्त्वाचे औषध विकत घ्यावयाचे असो या प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड नंबर देणं बंधनाकरक करण्यात आलं आहे. आधार कार्डच्या नोंदणीचा सरकारनं जणू सपाटाच सुरु केला आहे. परंतु या केंद्र सरकारच्या सपाट्यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी जोरदार टीका केली आहे. कंडोम घेण्यासाठी आधारकार्ड हवेतच कशाला असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. याबाबत इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती आणि पी चिदंबरम यांच्यामध्ये शाब्दीक चकमक झाली आहे.
‘कोणत्याही गोष्टीला आधार लिंक करणं योग्य नसून त्याचे गंभीर परिणाम होतील. अविवाहीत जोडप्यांना एकत्र सुट्टी घालवायची असेल तर त्यात चुकीचं काय आहे? असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. तसेच जर एखाद्या तरुणाला कंडोम खरेदी करायचे असेल तर त्याला त्याची ओळख दाखविण्यासाठी आधार कार्ड देण्याची सक्ती करण्याचे कारण काय?,’ असा सवाल चिदंबरम यांनी नारायणमूर्ती यांना केलाय. तसेच बँक खात्याशी आधार लिंक करण्याची गरज काय आहे. मी माझा आधार नंबर बँक खात्याशी जोडला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS