राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीला पूर्णविराम, ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब !

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीला पूर्णविराम, ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब !

राजस्थान – राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत राज्याला उत्सुकता लागली होती. याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी 5 वाजता जयपूरमध्ये गहलोत यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी गहलोत यांनी दोनदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भुषवले आहे. शांत स्वभाव आणि संघटन कौशल्यासाठी त्यांची ओळख आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुका 4 महिन्यांवर आहेत, त्यामुळे राजस्थानमध्ये अनुभवी नेत्याची गरज आहे, असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटतंय. आणि हे राहुल गांधी यांनीही मान्य केलं आहे.पण गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर राजस्थानमधलं तरुण नेतृत्त्व सचिन पायलट नाराज झाल्याचं वृत्त आहे.

आज सकाळी पायलट आणि गहलोत दोघांनी नवी दिल्लीत राहुल यांची भेट घेतली होती. आधी पायलट राहुल यांना भेटण्यास गेले. सर्व 99 आमदारांची इच्छा आहे की मी मुख्यमंत्री व्हावं, असं पायलट राहुल यांना म्हणाले. पण राहुल यांनी तरुण नेतृत्त्वाऐवजी अनुभवी नेत्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे पायलट यांची नाराजी राहुल गांधी कशी दूर करणार याकडेही लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS