अहमदाबाद – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडले आणि चुकून स्वत:च्या गाडीत बसण्याऐवजी घाईत दुसऱ्याच गाडीत बसले.
अहमदाबादमध्ये हा प्रसंग घडला. फडणवीसांना पत्रकारांनी गराडा घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. गोंधळात दुसऱ्याच गाडीत जाऊन बसले.मुख्यमंत्री गाडीत बसल्यानंतर गाडीचा ड्रायव्हर चुकीचा असल्याच लक्षात त्यांच्या आलं. त्यांनी त्या गाडीतून लगेच काढता पाय घेऊन उतरले आणि दुसऱ्या गाडीत जाऊन बसले.
मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचं समजतंय.
COMMENTS