राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, आरोग्यमंत्र्यांचीही कबुली !

राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, आरोग्यमंत्र्यांचीही कबुली !

नागपूर – राज्यात बालमृत्युचे प्रमाण वाढलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः आरोग्यमंत्र्यांनी कबुली दिली आहे. विधानसभेतील लेखी उत्तरादरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे. एचएमआयएसच्या अहवालानुसार ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2017-18 या वर्षात 24 तासाच्या आत मृत्यू पावलेल्या अर्भकांची संख्या 3 हजार 778 एवढी असल्याची माहिती दीपक सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान या बालकांच्या मृत्यूची विविध कारणे असून 22 टक्के बालमृत्यू कमी वजनाच्या व अपु- दिवसांच्या अर्भकांचे झाले असल्याची माहिती आहे. तसेच न्यूमोनिया व जंतू संसर्गामुळे 7 टक्के बालमृत्यू, अतिसारामुळे 0.32 टक्के बालमृत्यू, श्वसनाच्या आजारामुळे 7 टक्के बालमृत्यू, श्वसनमार्गाच्या विकारामुळे 10 टक्के बालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तसेच मुंबई शहरात 483 बालकांचे मृत्यू झाले असल्याचं समोर आलं आहे. एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत तब्बल 13 हजार 541 बालमृत्यू झाले असल्याची माहिती दीपक सावंत यांनी दिली आहे.

COMMENTS