मुंबई – दिवसेंदिवस महागाई वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. गेली काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ होत आहे. अशातच आज केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरच्या सबसिडीमध्ये 48 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केंद्र सरकारचा निषेध केला असून या वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे. जनतेला आमिष दाखवून भाजप सरकारनं फसवणूक केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बहूत हो गई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार असं म्हणत भाजपनं देशात सत्ता स्थापन केली परंतु आता मोदी सरकारच्या काळातही महागाई वाढत आहे. त्यामुळे अबकी बार लांबूनच नमस्कार, नही चाहीए मोदी सरकार असं म्हणण्याची वेळ आली असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
COMMENTS