सातारा – आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सातारा सर्किट हाऊस परिसरात घेराव घातला आहे. तसेच राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर काय कारवाई करणार असा जाब चित्रा वाघ यांनी तावडेंना विचारला आहे. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरही उपस्थित होते. यावेळी तावडे यांनी राम कदम यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असून तुमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्या जातील असंही तावडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS