मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जोरदार धक्का बसला असून काही दिग्गज नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपा प्रवेश झाला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश केला आहे. तसेच नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला.
भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून मी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मी गद्दार नाही. पळून गेले नाही, राजीनामा देण्याअगोदर मी शरद पवारांना जाऊन भेटले, असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच
पतीच्या केसमुळे चित्रा वाघ यांना भाजपात प्रवेश करावा लागतोय, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावर वाघ यांनी प्रतिकेरिया दिली असून पवार साहेब ‘पवार साहेब’ आहेत. मी त्यांच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही, असं असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच राष्ट्रवादीत असताना सरकार विरोधात मी आवाज उठवला. महिलांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र झटले. आक्रमकपणे वंचित पिडितांच्या बाजू मांडल्या. विरोधात असताना सरकारविरोधात आवाज उठवला. आता सत्ताधारी पक्षात प्रवेश केलाय. महिलांना न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिल. जसं विरोधात असताना विरोधी पक्षाचं काम करण्याचा इमाने-इतबारे प्रयत्न केला तसाच प्रयत्न सरकारमध्ये असताना देखील करणार असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
COMMENTS