व्हीजेटीआयमधील विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या प्राध्यापकासह संचालकांवर कारवाई करा – चित्रा वाघ

व्हीजेटीआयमधील विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या प्राध्यापकासह संचालकांवर कारवाई करा – चित्रा वाघ

मुंबई- व्हीजेटीआयमधील विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या प्राध्यापकासह संचालकांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. यापूर्वीही याच काँलेजमधील एका शिक्षिकेनं विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुसरी घटना घडली असून या घटनेला दहा दिवस झाले असतानाही प्रशासनानं अजूनही कारवाई केली नाही. त्यामुळे तात्काळ या प्राध्यापकासह संचालकांवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान परीक्षा फॉर्मवर स्वाक्षरी घेण्यास गेलेल्या विद्यार्थिनीचा व्हीजेटीआयमधील प्राध्यापकाने विनयभंग केला होता. प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे स्वाक्षरीच्या बदल्यात चक्क शरीर सुखाची मागणी केली होती. असे न केल्यास परीक्षेत फेल करण्याची धमकी देखील या  प्राध्यापकाने दिली होती.या प्रकरणी व्हीजेटीआय प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दहा दिवसांनी आरोपी प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

महाविदयालय प्रशासन आरोपी प्राध्यपकावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडितेने केला. त्यानंतर प्रसार माध्यामांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्राध्यापकावर यापूर्वीही विनयभंगाचा आरोप झाला होता. परंतु, तेव्हाही त्याच्या विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही. स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना किती गुण द्यावे, हे प्राध्यापकांच्या हातात असते. याचाच गैरफायदा घेऊन प्राध्यापकाने हे कृत्य केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

COMMENTS