मुंबई – कोरोनामुळे बंद करण्यात आलेले सिनेमा हॉल आणि नाट्यगृहे उद्यापासून सुरु होणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार योगा क्लास आणि इनडोअर स्पोर्टस गेम्स यांनाही मुभा देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्तच्या ठिकाणी हे सर्व सुरू होणार आहे. सिनेमा हॉल 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सिनेमा हॉल सुरू होणार असले तरी तिथे फूड कोर्ट आणि फूड स्टॉक करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.
तसेच राज्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांडूना सरावासाठी कंटेनमेंट झोनबाहेर स्विमिंग पूल उद्यापासून सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय कंटेनमेंट झोनबाहेर योगा इन्स्टिट्युटही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. टेनिस, बडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंगसारखे इनडोअर गेम साठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भावही दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र असं असलं तरीही कोरोनाची दुसरी लाट पुन्हा येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत खबरदारी आगामी काळातही घ्यावी लागणार आहे. राज्यात एकूण 15 लाख 31 हजार 277 रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. तर सध्या राज्यात एकूण 1 लाख 16 हजार 543 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.46 टक्के झाले आहे. परंतु तरीही खबरदारी घेण गरजेचं आहे.
आणखी बातम्या
अर्णब गोस्वामीला अटक, पाहा भाजप, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया!
अर्णब गोस्वामीला अटक, पाहा भाजप, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया!
COMMENTS