“अहो आमदार साहेब वरती काय बघताय, जरा खाली बघा”, त्रस्त नागरिकांची शिवसेनेच्या आमदारांविरोधात बॅनरबाजी !

“अहो आमदार साहेब वरती काय बघताय, जरा खाली बघा”, त्रस्त नागरिकांची शिवसेनेच्या आमदारांविरोधात बॅनरबाजी !

मुंबई – काही दिवसांपूर्वीच पुण्यातील नगरसेवकाविरोधात त्रस्त नागरिकांनी बॅनरबाजी केली होती. परिसरातील समस्यांकडे लक्ष दिलं जात नसल्यामुळे प्रभाग क्रमांक 33 मधील नागरिकांनी आपल्या समस्या बॅनरद्वारे मांडल्या होत्या. त्यानंतर आता अंबरनाथ शहरातील खड्डयांविरोधात नागरिकांनी आमदारांवर निशाणा साधला आहे. अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात नागरिकांनी शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्याविरोधात हा बॅनर लावला आहे.

या बॅनरमध्ये आमदार बालाजी किणीकर खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुम्हाला फक्त एसी गाडीतून फिरण्यासाठी निवडून दिलेलं नाही. जरा रस्त्याच्या दुर्दशेकडे बघा असं संदेश नागरिकांनी आमदारांना दिला आहे. तसेच बालाजी किणीकर यांचा बॅनरमध्ये वर बघतानाचा फोटो लावला आहे. त्यामुळे अहो आमदार साहेब वरती काय बघता, जरा खाली बघा असंही लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे या बॅनरची दखल घेऊन आमदार बालाजी किणीकर हे रस्त्याची दुर्दशा दूर करणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS