राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर !

राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर !

नवी दिल्ली – नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेनंतर राज्यसभेत हे विधेयक मांडलं. विधेयकाच्या बाजूने 117 मतं पडली आहेत. तर विधेयकाच्या विरोधात 92 मतं पडली. या विधेयकावर सकाळपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर रात्री 8 च्या सुमारास यावर मतदानप्रक्रिया सुरु करण्यात आली. यावेळी लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. मात्र राज्यसभेत शिवसेनेनं सभात्याग करत विरोध या विधेयकाला विरोध दर्शवला.

दरम्यान शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला होता. परंतु राज्यसभेत शिवसेनं या विधेयकावर टीका केली तसंच या विधेयकाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर टीका केली. एका रात्रीत त्यांनी भूमिका कशी काय बदलली? महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेनं याचं उत्तर द्यावं अशी खरमरीत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केली. सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात हे शिवसेनेने दाखवून दिलं आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

COMMENTS