फडणवीसांना शेअर केलेला व्हिडीओ पाहून पृथ्वीराज चव्हाण संतापले, “हे पाहून वाईट वाटलं !”

फडणवीसांना शेअर केलेला व्हिडीओ पाहून पृथ्वीराज चव्हाण संतापले, “हे पाहून वाईट वाटलं !”

मुंबई – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं या कायद्याला विरोध केला आहे. यावरुन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही विद्यार्थी ‘हिंदुओं की कबर खुदेगी’ असे नारे देताना दिसत आहेत. तसंच या व्हिडिओवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. ‘अशा आंदोलनांना प्रोत्साहन देऊन शिवसेनेनं आता स्पष्ट केलं आहे की वैयक्तिक लोभांच्या बाबतीत तडजोडी करण्यास शिवसेना किती प्रमाणात खाली उतरली आहे’, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेल्या याच व्हिडिओवरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण संतापले असल्याचं पहायला मिळालं. एका फॅक्ट चेकिंग वेबसाईटने हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे. याच वेबसाईटचा आधार घेत चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ‘नैराश्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत, हे पाहून वाईट वाटलं. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने व्हिडिओची सत्यता तपासायला हवी होती. माजी गृहमंत्री आणि जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी द्वेषपूर्ण आणि बनावट माहिती पसरवणं टाळलं पाहिजे,’ असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणार कायद्यावरुन राज्यातीलही राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS