राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा आढावा !

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा आढावा !

मुंबई – राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे मुंबई विदयापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या निकालाचा तसेच इतर अनुषंगिक विषयांचा विस्तृत आढावा घेतला आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेही उपस्थित होते. आगामी उन्हाळी परीक्षांचे निकाल वेळेवर लागण्यासाठी करावयाच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली आहे.

दरम्यान मागील वर्षी मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे यावर्षी विद्यापीठातील निकाल वेळेवर लावण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात असून यावर्षी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असल्याचं दिसत आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सह सचिव सिध्दार्थ खरात, मुंबई विदयापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. विष्णू मगरे, आदी उपस्थित होते.

COMMENTS