मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर उध्दव ठाकरेंनी घेतला ‘हा’ निर्णय ?

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर उध्दव ठाकरेंनी घेतला ‘हा’ निर्णय ?

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रात्री उशीरा बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज होता. परंतु येत्या सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. रविवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल आणि नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.मात्र दोन्ही पक्षातील अंतर्गत कलह सुरु झाल्याचं बोललं जातं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेत अंतर्गत कलह वाढला आहे. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नावाची चर्चा आहे. पण यावरुन नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केल्याचं दिसत आहे. तसंच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे या सर्व बाजूंचा विचार करता उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS