बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना आनंदाजी बातमी दिली असून ज्या शेतक-यांनी कर्ज घेतले आहे परंतु त्यांनी अर्ज भरला नाही अशा शेतक-यांनाही कर्जमाफी दिली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बीडमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असून कर्जमाफीचा लाभ मराठवाड्याला जास्त मिळाल्याचे सांगून चार हजार कोटी वितरित केल्याचे स्पष्ट केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरलाच नाही, अशा शेतकऱ्यांची यादी काढून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यातील तरुणांच्या नोकरीबाबतही फडणवीस यांनी घोषणा केली असून पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत. दोन टप्प्यांत ही भरती होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS