शरद पवार यांनी मला राजकीय व्यवस्थापणासाठी पुस्तक द्याव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवार यांनी मला राजकीय व्यवस्थापणासाठी पुस्तक द्याव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर-उस्मानाबाद : माजी मुख्यमंत्री शरद पवार हे उत्कृष्ट व्यवस्थापक असुन यांनी मला सुद्धा राजकीय व्यवस्थापनाची पुस्तिका द्यावी असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या राजकीय व्यवस्थापनाचा नेमका अर्थ काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

किल्लारी येथील भूकंपाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र सरकार व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने उस्मानाबाद व लातूर जिल्हा दुष्काळमुक्ती करीता निर्धार समारंभ किल्लारी येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना म्हणाले की, किल्लारी च्या भुकंपामध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. त्यावेळी त्यांना शासनाने जागा देऊन तर काहींना घर बांधून मदत केली आहे. मात्र आता भुकंपग्रस्तांची कुटुंब वाढले आहे. त्यामुळे या कुटुंबांना शासनाच्या वतीने जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्यांनी कमी मोबदल्या मध्ये जागा दिल्या होत्या त्यांना सुद्धा यावेळी जागा देण्याचे नियोजन चालू आहे.

किल्लारी येथे भूकंपाच्या काळात अहोरात्र काम केले ते शरद पवार हे संकट मोचन आहेत. त्याकाळी यांनी व्यवस्थापनाचे उत्तम काम दाखवल्यामुळे काही काळात येथील जिवन पुर्ववत झाले होते. आणि या करीता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर व तत्कालीन जिल्हाधिकारी प्रविण परदेशी यांचे मोठे सहकार्य लाभले होते.

तसेच शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अनेक गावातील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असुन आता उस्मानाबाद व लातूर जिल्हा दुष्काळमुक्ती करण्यासाठी भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन विविध ठिकाणी जलसंधारणाची कामे करणार असुन पुढील काही महिन्यात मोठ्याप्रमाणात काम करुन दोन्ही जिल्हे दुष्काळमुक्ती करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

COMMENTS