मुख्यमंत्र्यांकडून पक्षांतर्गत विरोधकांना धक्के, गडकरी, पंकजा मुंडे, खडसे समर्थकांचे पत्ते कापले !

मुख्यमंत्र्यांकडून पक्षांतर्गत विरोधकांना धक्के, गडकरी, पंकजा मुंडे, खडसे समर्थकांचे पत्ते कापले !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत विरोधकांना धक्के दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. फडणवीस यांनी नितीन गडकरी, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्या समर्थकांचे पत्ते कापले
आहेत. तसेच एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंचे नावही पहिल्या यादीत नाही. त्यामुळे त्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश कराड यांची लातूर ग्रामिणची जागा शिवसेनेला सोडली आहे. तर गडकरींच्या काही समर्थकांची तिकीटही कापण्यात आले आहे. सुधाकर कोहळे यांचे दक्षिण नागपूरमधून तिकीट कापले असून याठिकाणी फडणवीसांचे कट्टर समर्थक मोहन मते यांना तिकीट देण्यात आलं आहे. तसेच गडकरी समर्थक समजले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचेही पहिल्या यादीत नाव नाही. त्याचबरोबर नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथील उदयसिंग पाडवी खडसे समर्थक म्हणून ओळख जातात. त्यांनाही पहिल्या यादीत उमेदवारी देण्यात अलेली नाही.

COMMENTS