मुंबई – राज्यात ‘कोरोना’चे संकट वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह 18 पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. आज दुपारी दोन वाजता सर्वपक्षीय बैठक होणार असून मुख्यमंत्री सध्याची कोरोना संदर्भातली सरकारची तयारी आणि राजकीय पक्षातील नेत्यांच्या सूचना आणि अपेक्षित सहकार्य याविषयी चर्चा करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान महाविकास आघाडीतील दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे. तसेच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलावले आहे. तसेच एमआयएम, माकप, भाकप, शेकाप अशा लहानमोठ्या 18 पक्षांच्या नेत्यांनाही बोलावले आहे. त्यामुळे या बैठकीला कोण कोण उपस्थिती लावणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS