मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारमध्ये खलबतं !

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारमध्ये खलबतं !

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.  यासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे तर काही मराठा आमदार आणि काही नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण आणखी चिघळत असल्याचं दिसत आहे. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध नेत्यांसोबत आज बैठक बोलावली असल्याची माहिती आहे. भाजपमधील काही ठरावीक आमदार आणि सरकारमधील काही मंत्र्यांसोबत ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील हालचाली सुरु केल्या असून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवास्थानी काही नेत्यांसोबत आज बैठक घेतली असल्याची माहिती आहे. राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर मार्ग कसा काढायचा याबाबत या मंत्र्यांनी राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा सुरु केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर लवकरच तोडगा निघू शकतो असं बोललं जात आहे.

COMMENTS