‘हे’ होणार त्रिपुराचे मुख्यमंत्री ?

‘हे’ होणार त्रिपुराचे मुख्यमंत्री ?

मुंबई – त्रिपुरामध्ये 25 वर्षानंतर सत्ताबदल झाला असून डाव्यांचा गड उद्ध्वस्त करण्यात भाजपला यश आलं आहे. 2013 मधील निवडणुकीत या विधानसभेमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. परंतु यावर्षीच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारत बहूमतानं विजय मिळवला आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं सर्वस्व पणाला लावलं होतं. विशेष म्हणजे कोणताही चहरा समोर न ठेवता भाजपनं ही निवडणूक लढवली असून आता या राज्यात मुख्यमंत्री म्हणून भाजप कोणाला संधी देणार याचीच चर्चा सुरु आहे.

दरम्यान त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदासाठी बनमालीपूर या ठिकाणाहून निवडणूक लढवणारे बिप्लब कुमार देब यांचं नाव आघाडीवर आहे. बिप्लब कुमा देब हे शांत स्वभावाचे असून राजकारणातील स्वच्छ प्रतिमा असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हेगारी खटला नाही. आरएसएसचे नेते एन गोविंदाचार्य यांना ते आपले आदर्श मानतात. नेतृत्त्वगुण, राजकारणातील समज याचे धडे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळाले आहेत. तसेच त्यांनी राज्यात भाजप वाढीसाठी मोठं काम केलं आहे. त्यामुळे बिप्लब यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते याबाबतची चर्चा सध्या त्रिपुरात रंगत आहे.

 

COMMENTS