मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या नाराजीला दुजोरा दिला असून अशा घटनात्मक पदाचा त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सत्तावाटप निश्चित केलं होतं. त्यात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे तर, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले होते. मात्र, काँग्रेस नेतृत्वानं पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याने पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, पटोले यांनी राजीनामा देतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. . यावर अजित पवारांनी मत मांडले.
पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काळजीवाहू अध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ हे पदभार स्विकारणार आहेत. फक्त मला आणि मुख्यमंत्र्यांना एक वाटत होतं की अधिवेशन तोंडावर आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे घडलं असतं तर अधिक बरं झालं असतं, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे’जी काही पदं आहेत ती त्या पक्षांना ठरवल्याप्रमाणे दिली आहेत.
तर संजय राऊत म्हणाले, नक्कीच ती भूमिका आहे. कारण अशा प्रकारच्या घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असं आम्ही सामनात म्हटलं आहे. पाच वर्षांसाठी अध्यक्षपद असतं. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीनं राजीनामा दिल्यानं पुन्हा निवडणूक होते. महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांचं बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS