मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित केला असल्याची घोषणा केली आहे. अंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी शिवसेनेसह विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी केली होती. पंरतु मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्य सरकारमधील इतर मंत्री तोंडघशी पडले आहेत. खास करून महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे कालपर्यंत अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याबाबत ठाम होत्या परंतु मुख्यमंत्र्यांनी आज अचनाक या कायद्याला स्थगिती दिल्यामुळे त्या तोंडघशी पडल्या आहेत.
दरम्यान विधानपरिषदेत चंद्रकात पाटील, विधानसभेत विनोद तावडे हे मेस्मा लावण्याबाबत ठाम भूमिका घेतांना दिसले होते. त्यांनी या कायद्याचे जोरदार समर्थनही केले होते. तर दोन्ही सभागृहात पंकजा मुंडे यांनी मेस्मा लावण्याबाबत जोरदार भूमिका मांडली होती. मात्र आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेबाबत यु टर्न घेत मेस्माला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. यामुळे मेस्माचे जोरदार समर्थन करणारे मंत्री तोडघशी पडल्याचे चित्र आज बघायला मिळाले आहे.
दरम्यान मेस्मा कायद्याला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसह विरोधकांचा वाढता विरोध पाहता हा कायदा मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे इतर मंत्री मात्र तोंडघशी पडले आहेत.
COMMENTS