मंत्रिमंडळातील ‘या’ मत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांकडे सोपविले राजीनामे !

मंत्रिमंडळातील ‘या’ मत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांकडे सोपविले राजीनामे !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या 13 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या विस्तारापूर्वी काही जुन्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले असल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला 10+2+1 असा असून यामध्ये भाजपला 10, शिवसेनेला 2 तर रिपाइंला एक अशी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे.

दरम्यान, विखे पाटील यांना सार्वजनिक बांधकाम, आशिष शेलार यांना गृहनिर्माण, अनिल बोंडे यांना कृषी, डॉ. संजय कुटे यांना समाज कल्याण, सुरेश खाडे यांना आदिवासी विकास, अशोक उईके यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

मराठवाड्यातील दोन नेत्यांनी घेतली शपथ

मुंबईतून आशिष शेलार (भाजप), योगेश सागर (भाजप), अविनाश महातेकर (रिपाइं) यांनी शपथ घेतली.

पश्चिम महाराष्ट्रातून सुरेश खाडे (भाजप), बाळा भेगडे (भाजप) यांनी शपथ घेतली.

मराठवाड्यातून अतुल सावे (भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) यांनी शपथ घेतली.

उत्तर महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) यांनी शपथ घेतली.

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातून तानाजी सावंत (शिवसेना) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

विदर्भ
अनिल बोंडे (भाजप), परिणय फुके (भाजप), संजय कुटे (भाजप), अशोक उईके (भाजप)
यांनी शपथ घेतली.

COMMENTS