अहमदनगर – अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असून योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ‘राज्यातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच या समितीचा निर्णय आल्यावर विभाजनाचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
दरम्यान अहमदनगरचं विभाजन करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासून होत आहे. प्रशासकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार हाकणंही अवघड होत असल्यामुळे ही मागणी केली जात आहे. अहमदनगर जिल्हा कृती समितीने भौगोलिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या जिल्ह्याचं विभाजन का व्हावं, याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यामुळे याबाबत लवकरच सरकार निर्णय घेणार असल्याचं दिसत आहे. तसेच नगरचे दोन भाग व्हावेत ही लोकांची भावना आहे आणि येत्या निवडणुकीपूर्वी अहमदनगरचं विभाजन होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मार्ग आता मोकळा होत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS