मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर, आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला !

मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर, आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला !

औरंगाबाद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती स्थिर असून काही दिवस आराम करण्याचा डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला आहे. आज प्रकृती बिघडल्याने त्यांना वाशीमचा दौरा अर्धवट सोडून औरंगाबादला यावं लागलं होतं.  मुख्यमंत्र्यांना अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यामुळे ते बुलडाण्याचा कार्यक्रम आटोपून थेट औरंगाबादला आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांना हायपर अॅसिडीटीचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सततचं काम, अपुरी झोप यामुळं असा त्रास होऊ शकतो, चितेचं कारण नसून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.  डॉक्टरांनी सांगितलंय.दोन तास विश्रांती घेतल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाले. त्यांच्या सोबत पर्यटनमंत्री जयकुमार रावळ हेही होते.

बुलडाणा येथील राजमाता जिजाऊच जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजाच्या  विकास आराखड्याचे ३११ कोटीच्या निधीमधील प्रथम टप्प्याचा निधी पंचवीस कोटी मंजूर झाला आहे. त्यातील १२ कोटी ९६ लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते.  त्यामुळे त्यांनी पुढील कार्यक्रम रद्द केले.

COMMENTS