मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी अडचणीत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी अडचणीत?

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी अडचणीत आली असल्याचं दिसत आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट २३ जुलै रोजी अंतिम निकाल देणार आहे. गुन्ह्यांची माहिती लपवल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रिम कोर्ट २३ जुलै रोजी काय निर्णय देणार हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ४ मार्च १९९६ आणि ९ जुलै १९९८ ला दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्य़ात त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयातून ३ हजार रुपये व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मिळविला होता. २०१४ ची विधानसभा निवडणूक लढण्याकरिता फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. परंतु निवडणूक अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती अर्जात नमूद केली नव्हती.

त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका अॅड. सतीश उके यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, हायकोर्टाने त्यांची ही याचिका रद्द केली होती. त्यानंतर उके यांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. त्यामुळे आता सुप्रिम कोर्ट काय निर्णय देणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS