मुख्यमंत्र्यांनी ठरवला तिसरा मंत्री, ‘या’ नेत्याला दिली मंत्री करण्याची ग्वाही !

मुख्यमंत्र्यांनी ठरवला तिसरा मंत्री, ‘या’ नेत्याला दिली मंत्री करण्याची ग्वाही !

यवतमाळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज यवतमाळमध्ये सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निलय नाईक यांना मंत्री करण्याची ग्वाही दिली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना तर माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांना मंत्री बनवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आगामी मंत्रिमंडळतील तिसरा मंत्री ठरवला आहे. जर तुम्ही निलयभाऊंना विधानसभेत पाठवलं तर माझा शब्द आहे की मी निलय भाऊला मंत्री बनविणार. विधानपरिषदेच्या सदस्याला मंत्री करण्याबाबत मोदीजींनी नियम बनविले आहे, त्यामुळे निलयभाऊंना विधानसभेत पाठवा. जाताना निलय भाऊ आमदार जातील येताना मंत्री म्हणून येतील असं मुख्यमंत्री म्हणाले आहे.

दरम्यान या मतदारसंघात निलय नाईक यांची लढत त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार इंद्रनील नाईक यांच्याशी होत आहे.निलय नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. निलय नाईक हे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. मात्र तरीही ते आता विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. हे दोघेही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS