वसई – होय ती ऑडिओ क्लिप माझी असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. परंतु जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप मोडून- तोडून सादर केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ही संपूर्ण ऑडिओ क्लिप 14 मिनिटांची आहे. मी स्वत: ती क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण क्लिप ऐकवली. तसंच शिवसेनेने त्यांना हवी तशी ऑडिओ क्लिप एडिट केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. साम दाम दंड भेद याचा अर्थ कूटनिती असा होतो असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान साम-दाम-दंड-भेद म्हणजे कूटनिती आहे. समोरचा जसा वागेल, तसं वागा, जसा वार करेल, तसा वार करा, असं मी म्हटलं होतं. परंतु शिवसेनेने एडिट करुन ऑडिओ क्लिप दाखवली, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पराभव दिसत असल्यामुळेच शिवसेना खालच्या थरावर पोहचली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सत्ता पक्ष आहोत, सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही, असं या क्लिपमधील शेवटचं वाक्य होतं. मात्र ते त्यांनी दाखवलं नसल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. जी ऑडिओ क्लिप शिवसेनेने जारी केली आहे, ती संपूर्ण ऐका. जर त्या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह आढळलं, मी दोषी आढळलो तर माझ्यावर कारवाई करा, असही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS