हेलिकॉप्टर अपघातातून पुन्हा बचावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

हेलिकॉप्टर अपघातातून पुन्हा बचावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस आणि त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताचं सत्र काही संपताना दिसत नाही. गुरुवारीही त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता होता टळला आहे. भाईंदरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असता सेवन ११ शाळेत हेलिकॉप्टर उतरत असताना त्याठिकाणी वायर होती. या वायरवर चालकाचं लक्ष गेल्याने पून्हा हेलिकॉप्टर वर नेऊन दूस-या दिशेनं ऊतरवण्यात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली आहे.  परंतु मुख्यमंत्री कार्यालयाने हेलीकॉप्टर दुर्घटनेची बातमी फेटाळली असून असे काहीही घडलं नसल्याचा  दावा  कार्यालयानं केला आहे.

ज़र वेळीच या वायरकडे चालकाचं लक्ष गेलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. यानंतर ख़बरदारीचा उपाय म्हणून कार्यक्रमानंतर परत जाताना फड़णवीस यांनी गाडीनं प्रवास केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यापूर्वीही हेलिकॉप्टरच्या अपघातातून बचावले आहेत. या घटनेवरुन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS