हेलिकॉप्टरबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय !

हेलिकॉप्टरबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय !

मुंबई – हेलिकॉप्टरबाबरत मुख्यमंत्र्यांनी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने हेलिपॅड बनवण्यासाठी धोरण तयार केलं आहे. केंद्रीय नागरी विमान महासंचालनालयाच्या नियमांवर आधारित  हे धोरण तयार करण्यात आलं आहे. सरकारच्या या धोरणानुसार सर्व जिल्ह्यात कायमस्वरुपी हेलिपॅड उभे करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असून त्यासाठी जागा निश्चित करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून चार हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आता सावधानतेचा पवित्रा घेतला आहे.

असं आहे धोरण !

हेलिपॅड बांधण्यासाठी खुले मैदान, जिल्हा पोलीस परेड मैदान, एमआयडीसीतील मोकळी जागा यांना प्राधान्य देण्यात येणार असून हेलिपॅडची जागा सपाट, मजबूत, त्याठिकाणी हलकसं गवत तसेच त्याठिकाणी दगड, डेब्रिज नसावे. हेलिपॅडसाठी निवडलेली ५२ x ५२ मीटची जागार पूर्णपणे मोकळी असण्याची अट आहे. तसेच  हेलिकॉप्टर उतरण्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरपासून २४५ मीटर आणि हेलिपॅडपासून ५०० मीटर परिघात कोणताही अडथळा नसण्याची खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मानवी वस्त्यांपासून हेलिपॅडची जागा दूर असावी आणि त्या परिसरात वीज वाहिन्या, डाटा-टेलिफोन केबल, ट्रान्सफॉर्मर, मोबाईल टॉवर अशा कुठलेही उड्डाणात अडथळा आणणारे घटक नसावेत अशीही अट आहे.

 

COMMENTS